पिंपरी : मागील साडेतीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांवर आणखी पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. पावसाने ओढ दिल्याने पवना धरणातील पाणीसाठा १८.७६ टक्यांवर आला असून ३० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास पाणी कपात करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवनातून ५१०, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ५० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) २० असे ५८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. शहरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. आंद्रा धरणातून टप्प्या-टप्प्याने आणखी ५० एमएलडी पाणी घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’कडून लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या समोरचे आव्हान काय?

पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्‍यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. गतवर्षी पाणलोट क्षेत्रात दोन हजार ७७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तीन वेळा धरण शंभर टक्के भरले होते. ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते. पवना धरणात आजमितीला १८.७६ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. पावसाचे वातावरण होत आहे. मात्र, पाऊस काही पडत नाही. पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असतानाच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला चिंता सतावू लागली आहे. २२ जूननंतर मान्सून सक्रिय होईल, असे हवामान खात्याने सांगितले होते. मात्र, पावसाचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे ३० जूनपर्यंत धरण परिसरात पावसाला सुरुवात झाली नाही. तर, जुलैमध्ये पाणी कपातीच्या नियोजनासंदर्भात आयुक्तांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा – विदर्भात पावसाची जोरदार सलामी, अनेक जिल्ह्यांत रात्रीपासूनच मान्सून सक्रिय, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा

तूर्तास पाणी कपातीचा विचार नाही. पण, ३० जूनपर्यंत पाऊस झाला नाही. तर, आयुक्तांशी चर्चा करून पाणी कपात करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. – श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका