पुणे : खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. महापालिकेने पाण्याचा दैनंदिन वापर मर्यादित ठेवावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्राद्वारे केली आहे. महापालिकेनेही या पत्राची दखल घेतल्याने नव्या वर्षात पाणीकपात होण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भात आढावा बैठक आणि आयुक्तांबरोबर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चार धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रतिदिन १ हजार ६५० दशलक्ष लीटर (एमएलडी) एवढे पाणी धरणातून उचलते. यंदा जलसंपदा विभागाने शहरासाठी वार्षिक १२.६० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा मंजूर केला आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. तसेच वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची मागणही वाढली आहे.

हेही वाचा… पिंपरी : आठ मुली, वंशाला दिवा नाही, दुसऱ्या लग्नाचा विचार; पत्नीने दिली पतीची सुपारी…केले २० ते २१ वार

खडकवासला प्रकल्पात २४.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असला तरी त्यापैकी ८.५४ टीएमसी पाणी रब्बी हंगामासाठी आरक्षित आहे. त्यामुळे शहरासाठी १५.५० टीएमसी एवढा पाणीसाठा असून जूनपर्यंत या पाण्याचे नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. सध्याच्या पाणी वापराचा विचार करता पुढील २४४ दिवसांसाठी दैनंदिन वापर १ हजार २५० ते १ हजार ३०० एमएलडी इतका केल्यास २.८० टीएमसी ते ३.२३ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र दिले असून, दैनंदिन पाणी वापर कमी करण्याची सूचना केली आहे.

हेही वाचा… आगीच्या दुर्घटनेनंतर पिंपरी महापालिकेकडून हालचाली; ‘या’ ठिकाणी होणार जळीत कक्ष

जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. दैनंदिन पाण्याचा वापर कमी करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, पाणीकपातीसंदर्भातील निर्णय आढावा बैठक आणि आयुक्तांबरोबर चर्चा केल्यानंतर घेतला जाईल. – नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका