माढा : रोजचा पारा ४२ ते ४४ डिग्री सेल्सिअस, आटलेल्या विहिरी आणि कोरड्या पडलेल्या नद्या – धरणे; एकीकडे सगळे जीव या ऊन – उकाड्याने हैराण आणि पाण्यासाठी व्याकूळ झालेले असतानाच माढ्यात निवडणूक अवतरली आहे. या असह्य उन्हाने आणि पाणीटंचाईने जनता त्रस्त आहे, तर राजकीय पक्षही याच पाणी प्रश्नावर प्रचार तापवण्यात व्यग्र आहेत.

सोलापूर, सातारा जिल्ह्यातील माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, फलटण, माण आणि खटावचा काही भाग एकत्र येत हा मतदारसंघ तयार झालेला. खरे तर हा सगळा प्रदेश म्हणजे वर्षानुवर्षे दुष्काळाचा कलंक भाळी लागलेला. त्यामुळे इथल्या आजवरच्या सर्वच निवडणुका या पाणी- दुष्काळाभोवती फिरत आलेल्या. आज ७० वर्षांनंतरही माढ्यात फिरू लागलो, की ही झळ जाणवू लागते.

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्यास मारहाण
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
buldhana two farmer brothers house destroyed due to cylinder explosion
गॅस सिलिंडर चा स्फोट! भावांचे कुटुंब वाचले; संसाराची राख रांगोळी

माढ्यात प्रवेशावेळीच कोरडे पडलेले उजनी धरण दिसते आणि या धगीची जाणीव होते. पुढे एकेक तालुका फिरू लागलो, की ही धग आणखी चटके देऊ लागते.

अकलूजच्या रस्त्यावर असताना पाण्याचा एक टँकर दिसला. चौकशी केली तर आत बसलेला राहुल इनामके हा तरुण शेतकरी म्हणाला, ‘वर सूर्य पेटलाय आणि खाली विहीर कोरडी झालीय. पाच किलोमीटरवरून पाणी आणून डाळिंबाची बाग जगवतोय. निवडणूक काय येईल-जाईल. तिथं पाणी थोडंच मिळंल?’

निवडणूक ही पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नाही, तर केवळ त्यावर प्रचार करण्यासाठी असते हे आता जनतेच्याही मनात ठाम रुजलेले. या वेळी जमलेल्या अन्य शेतकऱ्यांनीही मग आजवर कुणी काय काय आश्वासने दिली याच्या आठवणी जाग्या केल्या.

अकलूज आले. शहरी तोंडावळा घेतलेले हे एक मोठे गाव. सध्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील याच गावातील. पण गावात एसटी स्टँड, बाजारपेठेत फिरू लागलो, की इथेही निवडणुकीपेक्षा आग ओतणाऱ्या उन्हाची आणि पाणीटंचाईचीच चर्चा. डोक्यावर पांढरा पंचा चढवलेला प्रत्येक जण ‘काल ४२’, ‘आज ४४’ याच चर्चेत अडकलेला.

इथेच धैर्यशील मोहितेही भेटले. भाजप, मोदी, पवार हे सगळे मुद्दे सोडत तेही म्हणाले, की माढ्याची निवडणूक यंदा केवळ पाण्यावर होणार. उजनीच्या पाण्याचे नियोजन, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प, नीरा देवघरचे पाणी असे त्यांनी सांगितलेले सगळे मुद्दे पुन्हा पाण्याभोवती फिरू लागले.

हेही वाचा >>> राज्य मंडळाकडून दहावी, बारावीच्या निकालाबाबत अपडेट… गेल्या वर्षीपेक्षा यंदा लवकर निकाल

अकलूज सोडत अन्यत्र फिरू लागलो. भाजणाऱ्या उन्हामुळे रस्ते अगदी निर्मनुष्य. जे भेटले तेदेखील सावलीचा आसरा घेत बसलेले. वेळापूर (ता. माळशिरस) शिवारात असेच बाळासाहेब बंडगर भेटले. ते म्हणाले, ‘काहीच नाही, असं नाही. रस्ते झालेत. फलटण, सांगोल्यात पाणी आलंय. सत्तर वर्षांचं हे दुखणं लगेच कसं सुटंल?’

प्रश्न होतेच, पण या अशा प्रतिक्रियांमधून काही ठिकाणी ते सुटत असल्याची जाणीवदेखील होती. पंढरपूरमध्ये भेटलेले गोपाळ गुरव असाच प्रश्न विचारून गेले, ‘अस्मानीचं ठीक आहे हो, पण सुलतानीच काय?’

तापलेल्या रस्त्यांवरून मधेच एखादी प्रचाराची रिक्षा आणि त्यामागे धावणारे चार कार्यकर्ते वस्ती जागवत निघालेले दिसायचे. पाण्याचे आश्वासन देणारी पत्रके वाटताना तेच पुन्हा घरीदारी तांब्याभर पाणी मागायचे!

हेही वाचा >>> पुणे : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत भविष्य निर्वाह निधीचा अपहार; बनावट कागदपत्रांद्वारे नऊ कोटी रुपयांची फसवणूक

फलटणमध्ये शिरलो तसे या प्रश्नावर काही हालचाल दिसली. कुठे कालव्याची कामे, तर कुठे वाहू लागलेले पाणी. याचाच दाखला देत भाजपचे पदाधिकारी के. के. पाटील आणि बाळासाहेब सरगर म्हणाले, ‘दुष्काळ इथं पहिल्यापासूनच होता. तो हटवण्याचं काम आता कुठं सुरू झालं आहे.’

माढा, माळशिरस, पंढरपूर, फलटण असे एकेक तालुके जात होते. भाजणारे ऊन आणि पाणीटंचाई सगळे जीवन शुष्क करत होते. कुठे या प्रश्नाचे साचलेपण होते, तर कुठे तो सुटू लागल्याचा आशावाददेखील. आज भलेही माढ्यातील लढाई मोहिते विरुद्ध भाजपचे रणजितसिंह निंबाळकर अशी असली, तरी या लढतीचा पट यंदाचा कडक उन्हाळा आणि तीव्र पाणीटंचाईने व्यापून टाकला आहे. यामुळे माढ्यातून बाहेर पडताना हे दोन मुद्देच मनाशी साचून राहत होते.

Story img Loader