पुणे : वारजे जलकेंद्र, चांदणी चौक, गांधी भवन, वारजे, एसएनडीटी टाकी परिसर आणि स्वारगेट पाणीपुरवठा विभागाबरोबरच नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, चतु:शृंगी टाकी परिसरात विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी (२५ ऑगस्ट) करण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम पुण्याबरोबरच पेठांमधील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी (२६ ऑगस्ट) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे-
वारजे जलकेंद्र आणि चांदणी चौक टाकी परिसर- पाषाण साठवणूक टाकी, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, बावधन परिसर, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, गुरू गणेशनगर, सूरज नगर, सागर काॅलनी, भारती नगर, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसाटी, शांतीवन सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहननगर, सूस रस्ता कुंभारवाडी, काकडे सिटी, होम काॅलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्ह्यू गार्डन, पॉप्युलर काॅलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य काॅलेज परिसर, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, शेरावती सोसायटी, सिद्दकला सोसायटी, हिंगणे होम काॅलनी, मिलेनियन स्कूल परिसर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कॅनाॅल रस्ता.
चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण परिसर, शाहू काॅलनी गल्ली क्रमांक एक ते अकरा, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा.
एसएनडीटी टाकी- गोखलेनगर, शिवाजीनगर, माॅडेल काॅलनी, रेव्हेन्यू काॅलनी, कोथरूड, वडारवस्ती, स्टेट बँक काॅलनी, श्रमिक वसाहत, हॅपी काॅलनी, हनुमाननगर, मेघदूत, तेजसनगर, डहाणूकर काॅलनी, सुतारदरा, किष्किंधानगर, जयभवानीनगर, रामबाग काॅलनी, वडारवाडी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदूवाडी, भोसलेनगर, अशोकनगर, शिवाजी हौसिंग सोसायटी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, आपटे रस्ता, घोले रस्ता, सेनापती बापट रस्ता, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, कर्वेरस्ता, विद्यापीठ परिसर, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदूवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
पर्वती टाकी परिसर- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरूण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, मुळा रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंट परिसर, हरिगंगा सोसायटी.
चतु:शृंगी टाकी परिसर- औंध, बापोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.