पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राकडे जाणारी १ हजार ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून गळती निर्माण झाली आहे. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम येत्या रविवारी (१६ ऑक्टोबर) करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र रविवारी लष्कर जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा- ‘पुण्यातील पर्यटन क्षेत्र वाढीसाठी समितीची नेमणूक करा’; पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली

या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

लष्कर पाणीपुरवठा विभागाकडील बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, संपूर्ण हडपसर औद्योगिक परिसर, मुंढवा, केशवनगर, माळवाडी, मगरपट्टा, सोलापूर रोड डावी बाजू, १५ नंबर आकाशवाणी, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, ससाणेनगर, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकरमठ, वैदूवाडी, आनंदनगर, रामनगर, वानवडी, साळुंके विहार, आझादनगर, जगताप चौक परिसर, जांभुळकर मळा, सोलापूर रोड उत्तर बाजू, एस.व्ही. नगर, शांतीनगर, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, तरवडे वस्ती, कृष्णानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु., शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी पार्ट, संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एन.आय.बी.एम.रोड, रेसकोर्स या भागाला लष्कर केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा रविवारी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Story img Loader