पुणे : Entire Pune Water Supply to be Shut Down महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांसह अन्य जलकेंद्रातील टाक्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी (२२ ऑगस्ट) रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या कामामुळे शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

हेही वाचा >>> बारामतीमधून निवडणूक लढविण्यात ‘रस’ नसलेल्या अजित पवारांना शिरूमधून निमंत्रण !

sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Aditya Thackeray statement regarding desalination project Mumbai
आमचे सरकार आल्यानंतर नि:क्षारीकरण प्रकल्प पुन्हा राबवणार; आदित्य ठाकरे
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

पर्वती येथील नवीन आणि जुने जलशुद्धीकरण केंद्र तसेच त्याअंतर्गत एमएलआर, पर्वती एचएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, खडकवासला जॅकवेल, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, एसएनडीटी एमएलआर व एचएलआर परिसर, चतुशृंगी टाकी व त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची कामे तातडीने करणे गरजेचे असल्याने गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) २३ ऑगस्टला शहरातील विविध भागात सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.