वारजे जलकेंद्र अंतर्गत बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या गुरुवारी (२९ डिसेंबर) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी वारजे जलकेंद्राअंतर्गत काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी (३० डिसेंबर) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पिंपरीः भूमिपुत्रांना परतावा देण्याच्या निर्णयाची दोन वर्षानंतरही कार्यवाही नाही

महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य काॅलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अर्थव वेद, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहाजनंद, शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, प्रथमेश सोसायटी, डीपी रस्ता परिसर, बावधन, बावधन गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसायटी, विद्यानंगर, पाषाण रस्ता परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.