पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा शनिवार आणि रविवारी विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. रावेत येथे अशुध्द जलउपसा केंद्राअंतर्गत भोसरी व चिंचवड येथील जलवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम दोन दिवस जाणवणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोसरी, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, बोऱ्हाडेवाडी, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, दिघी, संत तुकारामनगर, मॅगझिन डेपो परिसर, बोपखेल, प्रेमलोक पार्क, चिंचवडगाव, पवनानगर, रस्टन कॉलनी, सुदर्शननगर, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह परिसर, पिंपरीगाव, पिंपरीनगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, नेहरूनगर, वल्लभनगर, कासारवाडी, प्राधिकरण पेठ क्रमांक २३ व २६, सिध्दीविनायकनगरी या भागातील शनिवारी (६ ऑगस्ट) दुपारी व संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. त्याचुप्रमाणे, दुसऱ्या दिवशी, रविवारी (७ ऑगस्ट) सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी व अपुऱ्या दाबाने होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्रीकांत सवणे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply of pimpri chinchwad will be disrupted for two days pune print news amy