पुणे : वडगांव जलकेंद्र, वडगांव राॅ वाॅटर आणि राजीव गांधी पंपिंग येथे विद्युत आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (२१ जुलै) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी सिंहगड रस्ता परिसराबरोबरच दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (२२ जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरठा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हिंगणे, आनंदनगर,वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.