पुणे : पर्वती जलकुंभ येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरूवारी (८ फेब्रुवारी) पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे या पर्वती टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> प्रतीक्षा संपली… शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध! सर्वाधिक जागा जिल्हा परिषद शाळांमध्ये 

सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग १ आणि २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लाॅट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क परिसर, गरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयक नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाब नगर याबरोबरच कोंढवा खुर्दचा काही भाग, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर आणि धनकवडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply remains closed in some part of pune on thursday pune print news awk 13 zws
Show comments