पुणे : लष्कर जलकेंद्र अखत्यारीत वानवडी टाकी, पर्वती जलकेंद्रअंतर्गत पर्वती आणि एसएनडीटी टाकी येथे फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या गुरुवारी (१५ सप्टेंबर) करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी (१४ सप्टेंबर) रात्री दहा वाजल्यापासून गुरुवारी शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (१६ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा <<<Maharashtra News Live : मुख्यमंत्र्यांचं पैठणमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन, एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा <<<‘रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करा’; जनसंवाद सभेत नागरिकांकडून मागणी

वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा संपूर्ण परिसर, सोलापूर रस्त्याच्या दोन्ही बाजू, रामटेकडी परिसर, सोपान बाग, उदय बाग, डोबरवाडी, कवडे-मळा, बी. टी. कवडे रस्ता, पर्वती गाव, संपूर्ण सहकारनगर, तावरे काॅलनी, आदर्श नगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकर नगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ काॅलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, एसबीआय काॅलनी, अरणेश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर बिबवेवाडी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा रस्ता परिसर, गंगाधाम परिसर, डायस प्लाॅट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, एसटी काॅलनी, स्वारगेट, संभाजीनगर, धनकवडी, चव्हाणनगर, अप्पर, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण, मोरे चाळ, गव्हाणे चाळ, भाग्योदयनगर, मीठानगर, साईबाबानगर, युनिटी पार्क, ज्ञानेश्वर मगर, सवेरा पार्क, शिवाजीनगर, भांडारकर रस्ता, बीएमसीसी रस्ता, रेव्हेन्यू काॅलनी, गोखलेनगर, माॅर्डन काॅलनी, वैदूवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, भोसलेनगर, खैरेवाडी, जनवाडी, सेनापती बापट रस्ता, कोथरूड, डहाणूकर काॅलनी, तेसजनगर, कोथरूड गावठाण, जोग शाळेजवळील परिसर, भेलकेनगर, गुजरात काॅलनी, सुतार दवाखान्या मागील परिसर, गाडवे काॅलनी, परमहंस नगर, सुतारदरा, रामबाग, आनंदनगर, आयडीयल काॅलनी, गुरूराज सोसायटी, वनाज परिसर, रामबाग काॅलनी, केळेवाडी, जय भवानी नगर, किष्किंदानगर, एमआयटी परिसर, हॅप्पी काॅलनी या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून कळविण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply some parts stopped all day thursday municipal corporation department inform pune print news ysh