लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे शहराला पणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला जॅकवेल, नवीन, जुने पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, लष्कर, वडगाव, वारजे, एसएनडीटी जलशुद्धीकरण केंद्र तसेच भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक तसेच देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे संपूर्ण पुणे शहर तसेच उपनगरांचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (१७ ऑक्टोबरला) पूर्ण दिवस बंद राहणार आहे.

10000 residents of Swapnpurti housing complex in Kharghar faced insufficient water supply for eight days
खारघरमधील स्वप्नपूर्ती संकुलात अपुरा पाणीपुरवठा
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Water supply to Kalyan-Dombivli towns will be closed on Tuesday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
Ambazari Bridge completed and will be opened soon for vehicles
नागपूर : अंबाझरी पूल सुरू होणार, काउंट डाऊन सुरु
tiger
नागपूर: पर्यटनाचा पहिलाच दिवस अन् वाघ…
Water supply to Kalyan East and West cities will be shut off on Tuesday from 10 am to 4 pm
कल्याण शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
Entry of wild elephants into Gadchiroli border Gadchiroli
रानटी हत्तींचा गडचिरोलीच्या सीमेत प्रवेश, शहरापासून चार किमी अंतरावर वाहतूक रोखली..
water supply in Navi Mumbai, Navi Mumbai water,
नवी मुंबईत शुक्रवारी सकाळीही पाणीपुरवठा नाही

या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१८ ऑक्टोबरला) उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. जलशद्धीकरण केंद्रातील कामे एका दिवसातच पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिकेचा असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-विधानसभेसाठी रिपाइंला हव्यात १२ जागा; जागा न दिल्यास प्रचार नाही, रिपाइंची भूमिका

पाणीपुरवठा बंद असलेला पर्वती जलकेंद्रातील भाग पुढील प्रमाणे…

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, सॅलेसबरी पार्क, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ

लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग : हडपसर परिसर, सातववाडी, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी, संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयतीएम रोड, रेसकोर्स, लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा

आणखी वाचा-पुणे: मानलेल्या भावाकडून चार वर्षांच्या भाचीवर अत्याचार, आरोपी पसार

वडगाव जलकेंद्र परीसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, आंबेडकरनगर, दाते बस स्टॉप परिसर.

एस.एन.डी.टी. (पाण्याची टाकी) : गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड, भीमनगर, वेदांतनगरी, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, मयुर कॉलनी परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत, मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकीलनगर, गिरीजा शंकर, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान परिसर, निलकमल युनायटेड वेस्टर्न

चांदणी चौक टाकी परिसर : पाषाण, भूगाव रोड, कोकाटे वस्ती, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, सुस रोड.

आणखी वाचा-चारित्र्याच्या संशयातून महिलेच्या डोक्यात सिलिंडर घालून खून, विश्रांतवाडी भागातील घटना; पती गजाआड

गांधी भवन टाकी परिसरः काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळनगर, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा, श्रावणधारा झोपडपट्टी, शांतीवन, गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

वारजे जलकेंद्र : कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, आंबेडकरनगर, दत्तनगर, अहिरेगाव, माळवाडी, यशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, गणपती माथा परिसर, एनडीए रोड. होळकर जलकेंद्र : मुळा रोड, खडकी कॅन्टोनमेंट संपूर्ण परिसर, हरीगंगा सोसायटी, कोंढवे-धावडे जलकेंद्र : वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंडवे धावडे, न्यु कोपरे परिसर तरी नागरिकांनी गुरुवारी आणि शुक्रवारी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.