पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला थेट पाणी देण्याऱ्या बंद नळयोजनेच्या विरोधातील आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारास दोन वर्ष पूर्ण झाली. तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तापलेल्या वातावरणात मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले, ते काम अजूनही बंदच आहे. तथापि, उपमुख्यमंत्र्यांना ते सुरू करायचे असल्याने पिंपरी पालिकेचा आटापिटा सुरू आहे. मयतांच्या वारसांना पिंपरी पालिकेत नोकरी देण्याचे अजितदादांनी विधानसभेत दिलेले आश्वासन हवेतच विरले असून गोळीबाराचे आदेश देणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्याविषयीचा चौकशी अहवाल तसाच पडून आहे.
पवना धरणापासून रावेतपर्यंतच्या ३५ किलोमीटर अंतराची योजना असून तिचा मूळ खर्च ३३९ कोटी होता. मात्र, २० टक्के जादा दराची निविदा मंजूर केल्याने सुरूवातीलाच ४०० कोटीवर खर्च गेला. ३० एप्रिल २००८ ला कामाचे आदेश निघाले. ७२ गावांनी योजनेला विरोध करून ग्रामसभांचे ठराव दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा