पुणे : वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी जलवाहिनीशी निगडीत काही कामे आणि चांदणी चौकाकडे जाणाऱ्या जलवाहिनी तसेच कोंढवे-धावडे टाकी येथील जलवाहिनी दुरुस्तीची कामे येत्या मंगळवारी (२१ नोव्हेंबर) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी पश्चिम भागातील बहुतांश ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :

हॅपी काॅलनी, नवीन शिवणे, रामबाग काॅलनी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर, केळेवाडी, हनुमान नगर, रामबाग काॅलनी, एमआयटी काॅलेज रस्त्याची डावी आणि उजवी बाजू, एलआयसी काॅलनी, माधव बाग, माॅर्डन काॅलनी, जयभवानी नगर, शिवतीर्थनगर, न्यू फ्रेंडस काॅलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, कांचनबाग, लिलापार्क, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझादवाडी, वनाज कंपनीमागील परिसर, गाढवे काॅलनी परिसर, वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्रमांक एक ते २१, स्टेट बँक काॅलनी, वनदेवी परिसर, मावळे आळी, दुधाने नगर, इंगळे नगर, गोसावी वस्ती, कोथरूड गावठाण, म्हसोबा मंदिर परिसर, डहाणूकर काॅलनी, आनंदनगर, आयडियल काॅलनी,मधुराज नगर, प्रतिक नगर, गुजरात काॅलनी, सकाळ नगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव, बाणे रस्ता, पंचवटी, पाषाण, निम्हणमळा, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण, चव्हाणनगर पोलीस लाइन, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, स्पायसर काॅलेज, आंबेडकर चौक, बोपोडी भोईटे वस्ती, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत, मोहननगर, लक्ष्मणनगर, रामनगर, बालेवाडी गावठाण, दसरा चौक परिसर, पाटील नगर, शिवनेरी पार्क, कोंढवे धावडे गावठाण, खडकवस्ती, टेलीफोन एक्सचेंज परिसर, न्यू कोपरे, उत्तमनगर गावठाण, देशमुख वाडी, सरस्वती नगर, पोकळेनगर, शिवणे गावठाण, इंगळे काॅलनी या भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to western region closed on tuesday amy
Show comments