पुण्यातील टाटा मोटर्स, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज् (डिक्की) आणि श्रीवरी इंजिनिअरिंग वर्क्स यांच्यातर्फे आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर गावाला पाण्याचे टँकर पुरविले जाणार आहेत. ‘टँकरला हिरवा झेंडा’ या उपक्रमाअंतर्गत हे वाटप करण्यात येणार आहे.
वडगावपीर दुष्काळाने होरपळलेल्या गावांपैकी एक आहे. पाण्याअभावी गावाचा विकास खुंटला आहे. पावसाळ्यापर्यंत रोज तीन टँकरद्वारे गावाला आवस्यक तेवढा पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली. पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिल्यामुळे दुष्काळाच्या झळा कमी होतील, असे मत गावाच्या सरपंच जयदाबी मुजावर यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा