पिंपरी- चिंचवड शहराची तहान भागवणारे पवना धरण ९२.२७ टक्के भरले असून वीज निर्मिती गृहाद्वारे १४०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग अकराच्या सुमारास करण्यात येणार आहे. अशी माहिती पवना धरण प्रशासनाने दिले आहे. पुढील काही तासांमध्ये अधिक चा पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे पवना धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. हे लक्षात घेऊन पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पवना धरणाच्या नदीपात्रात कोणीही उतरू नये अस आवाहन करण्यात आला आहे.
आणखी वाचा- ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांचं निधन; पुण्यातील रुबी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास!
गेल्या काही दिवसांपासून पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पवना धरण ९२.२७ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ८१ टक्क्यांवर वर होता. आज सकाळी ११ च्या सुमारास पवना धरणाच्या वीज निर्मिती गृहाद्वारे पवना नदीमध्ये १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात पुढील २४ ते ४८ तासात दमदार पाऊस झाला तर पवनाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना नदीपात्रात उतरू नये, नदीमधील पाण्याचे पंप नदीकाठच्या शेतातील अवजारे हे साहित्य तात्काळ बाजूला घ्यावेत असे आवाहन पवना धरण प्रशासनाने केले आहे.