पुणे: वानवडी परिसरात निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर शुक्रवारी रात्री हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना दगडाने ठेचण्यात आले आहे. हल्ल्यात वजीर शेख गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेख यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. शेख काही महिन्यांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते. ते सध्या कोंढवा परिसरात राहायला आहेत. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हल्लेखोराने त्यांना गाठले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर वानवडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा… स्वस्तात औषधे हवीत… पिंपरी स्थानकावर प्रवाशांसह नागरिकांसाठी अनोखी सुविधा

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेख गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wazir shaikh a retired police inspector was attacked in wanwadi area on friday night pune print news dvr