आम्हाला सहानुभूतीची मते नकोत आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहोत अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी दिली. त्यामुळे जनता भाजपाला मते देतील असे म्हणत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जगताप कुटुंबाला सहानुभूती आहे, पण लोकं भाजपाला मतदान करणार नाहीत असे विधान त्यांनी केले होते. त्यावर आज अश्विनी जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या की, रोहित पवार यांनी असे बोलायला नको होतं. सहानुभूती ची मते आम्हाला नकोत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत. कार्यकर्ते, पदाधिकारी स्वतः प्रचार करत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर जनता आम्हाला निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी रोहित पवार हे राष्ट्रवादी च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आले तेव्हा त्यांनी जगताप कुटुंबाबद्दल नागरिकांमध्ये सहानुभूती आहे. परंतु, नागरिक भाजपाला मते देणार नाहीत असे वातावरण चिंचवड मतदारसंघातील आहे असे म्हटले होते. यावर आज भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे.