Pune Porsche Crash Latest Updates: पुणे पोर्श अपघात प्रकरणात आज अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती ससून रुग्णालयातून समोर आली. त्यानंतर हे नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणी आता अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक झाली आहे. तसंच या प्रकरणावर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे प्रकरण दडपत आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्या अनुषंगाने अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“पुणे पोर्श अपघात प्रकरणा राज्य सरकार आणि पोलीस योग्य कारवाई करत आहेत. आम्ही सारखे कॅमेरासमोर येत नाही याचा अर्थ आम्ही लपवाछपवी करत आहोत, कुणाला तरी पाठिशी घालत आहोत असा होत नाही. विरोधकांनी काय आरोप करायचे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र ही घटना घडल्यापासून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Best Bus Accident News
Best Bus Accident : “माझे पती संजय मोरे दोषी नाहीत, बेस्टचा जो अपघात झाला तो..”, पत्नीचा दावा काय?

हे पण वाचा- पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

मुलाच्या बापाला, बापाच्या बापालाही अटक केली

“पोर्श अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले, त्यांच्यावरही कारवाई झाली अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येते आहे. अपघात घडला तेव्हा हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कक्षेत येते. त्यांनीही संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले. उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपल्या खात्याल सूचना दिल्या आहेत. एकूणच हे प्रकरण सगळ्यांनी गांभीर्याने घेतले आहे. रोज तपास पुढे सरकत आहे, दोषींवर कारवाई केली जात आहे. आधी मुलाला अटक झाली नव्हती, त्याला नंतर अटक करण्यात आली. त्यानंतर मुलाच्या बापाला, बापाच्या बापालही अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही”, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

पोलीस आयुक्तांना मी कायमच फोन करतो

पोर्श प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याचा आरोप अजित पवारांवर झाला होता, त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पुणे पोलीस आयुक्तांना मी कायमच फोन करतो. पुण्यातल्या अपघातानंतर दोषींवर योग्य कारवाई करा असं मी सांगितलं होतं. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते माझं कामच आहे असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader