राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बेनामी संपत्ती प्रकरणात ईडीकडून अटक झालेली आहे. मात्र अद्याप नवाब मलिक यांनी राजीनामा दिलेला नसल्याने, मलिकांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांन आज पुण्यात माध्यमांशी बोलाताना तसे संकेत दिले आहेत. शिवाय, “१९९३ च्या बॉम्ब स्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी काय प्रकारची भाषणं केली, ती भाषणं आता आम्ही मोठ्याप्रमाणावर ऐकवणार आहोत.”, असं सांगत त्यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. तसेच, ”आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना ती भूमिका घेणार का?” असा सवाल केला आहे.

…हे शिवसेनेच्या पण नेत्यांनी विचार करण्यासारखं आहे –

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “नवाब मलिकांचा राजीनामा का नाही? आणि तो झाला नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी काही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात फूट निर्माण करायचा प्रयत्न करत नाही. कारण ते खूप हुशार नेते आहेत, त्यामुळे तर त्यांनी एवढ्या बलाढ्य पक्षाला फसवलं आणि सरकार केलं. पण राठोडांच्या वेळी भाजपाने जरा आंदोलन केलं, एका दिवसात राजीनामा घेतला. अनिल देशमुखांचा राजीनामा सीबीआयची चौकशी लागली, उच्च न्यायालयात निर्णय झाला की तासाभरात राजीनामा झाला. मग नवाब मलिकांचा राजीनामा का नाही? शिवसेनेला त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यास राजीनामा द्यायला लावता आणि राष्ट्रवादीच्या कॅबिनेट मंत्र्यास राजीनामा देण्यास टाळाटाळ करतात, हे शिवसेनेच्या पण नेत्यांनी विचार करण्यासारखं आहे.”

Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”
Aditya Thackeray
“मुख्यमंत्री परदेशात असताना पालकमंत्रिपदांवर स्थगिती…”, आदित्य ठाकरेंना वेगळाच संशय; म्हणाले, “पहिल्यांदाच…”

“ … याचा अर्थ १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील दाऊदसह सगळ्याच गुन्हेगारांना महाविकास आघाडीचे नेते पाठबळ देतायत”

तसेच, “१९९३ च्या बॉम्ब स्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी काय प्रकारची भाषणं केली, ती भाषणं आता आम्ही मोठ्याप्रमाणावर ऐकवणार आहोत. खरं म्हणजे लोकाच्या आपआपल्या संग्रही ती आहेत. त्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका राष्ट्रवादी, काँग्रेसने नेहमीच भूमिका सोयीची घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच भूमिका हिंदुत्वाच्या बाजूने घेतली, ठाम घेतली, कोणाचाही विचार न करता व चिंता न करता घेतली. आता उद्धव ठाकरे , शिवसेना ती भूमिका घेणार का? हा प्रश्न आहे.” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

…तुम्ही आम्हाला काय कमी त्रास दिलेला नाही –

तर, मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं षडयंत्र आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणाले की एका विशिष्ट पक्षाच्याच नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. बाकी सगळ्या पक्षांच्या नेत्यांवर होती याचा विचार कुठंतरी केला गेला पाहिजे, असं माध्यम प्रतिनिधींनी सांगून त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मागील २७ महिन्यात तुमच्या हाती सत्ता असल्याने तुम्ही आम्हाला काय कमी त्रास दिलेला नाही. या त्रासावर आम्ही तुमच्याशी भांडत न बसता, न्यायालयात गेलो. मग तो ग्रामपंचायती बरखास्त झाल्यानंतर तुमच्या कार्यकर्त्यांना प्रशासकपदी नेमण्याचा विषय असू दे, तुमच्या एका मंत्र्याने पंधराशे कोटी रुपयांचे कंत्राट त्याच्या जावायला दिलेला विषय असेल किंवा १२ आमदरांच्या निलंबनाचा विषय असेल आम्ही न्यायालयात गेलो, न्याय मिळाला. तुम्ही देखील न्यायालयात जा न्याय मिळवा.”

Story img Loader