सामान्यांना असलेली लांडग्याची ओळख म्हणजे लहानपणी ऐकलेली ‘लांडगा आला रे
राज्याचा वन विभाग, पुण्याचा वन्यजीव विभाग आणि काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे लांडग्याविषयीची व्यापक माहिती संकलित करण्यासाठी ‘ओवीतला लांडगा’ हा प्रकल्प सुरू केला असून त्याच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शुक्रवारी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. अंतरा, ओईकॉस, बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाईल्डलाईफ कान्झव्र्हेशन सोसायटी, नेचर वॉक या संस्था आणि काही निसर्ग अभ्यासक या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. हा प्रकल्प पुढील एक वर्ष (सप्टेंबर २०१४ ते ऑगस्ट २०१५) चालणार असून त्यात लांडग्याचा वावर असलेल्या गवताळ प्रदेशांमध्ये फिरून, तिथल्या धनगरांशी बोलून लांडग्यांविषयी माहिती संकलित केली जाणार आहे. मिळणारी माहिती दर महिन्याला http://www.ovitla-landga.inया संकेतस्थळावर उपलब्धही करून दिली जाणार आहे.
लांडगा हा गवताळ प्रदेशावरील प्रमुख शिकाऱ्यांपैकी एक असून पुणे, सातारा, नगर,
सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे, निसर्ग शिक्षणातील तज्ज्ञ अनुज खरे आणि बिबटय़ावरील अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या वाईल्डलाईफ कान्झव्र्हेशन सोसायटीच्या विद्या अत्रेय या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम करणार असून वन्यजीव अभ्यासक गिरीश पंजाबी, त्रिशांत सिमलई, सायली पाळंदे- दातार, नित्या घोटगे, केतकी घाटे, अपर्णा वाटवे, प्रमोद पाटील आणि वन्यजीवशास्त्राच्या काही विद्यार्थ्यांचाही प्रकल्पात सहभाग आहे.
लांडग्यावरील अभ्यासासाठी वन विभागासह स्वयंसेवी संस्था सरसावल्या
लांडगा, गवताळ प्रदेश आणि माणूस यांचे बहुपदरी नाते उलगडण्यासाठी वन्यजीव विभागासह वन्यजीवविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-08-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Website on wolf