पुणे : “आगामी लोकसभा निवडणूक माझ्या कुटुंबियांच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. पवार कुटुंबियांमधील अन्य लोक माझ्या विरोधात प्रचाराला उतरण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक विकासकामांच्या मुद्द्यावरच जिंकण्याचा निर्धार आहे. त्याला बारामतीमधील जनतेने साथ द्यावी”, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

बारामती लोकसभेला वेगळा उमेदवार आणि विधानसभेसाठी वेगळा उमेदवार असे चित्र चालणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात चार-पाच वेळा खासदार झालेला उमेदवार असणार आहे. आपला उमेदवार नवखा आहे. तो पहिल्यांदाच खासदार होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत डाग लागला तर राजकारणातील माझी किंमत कमी होईल. राजकारणातील माझी किंमत बारामतीची जनता कमी होऊ देणार नाही, याचा विश्वास आहे. सध्या घड्याळ तेच आहे मात्र वेळ बदलली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Bhau Kadam talk on Ajit Pawar, Bhau Kadam,
“अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, अभिनेते भाऊ कदम यांना विश्वास, आणखी काय म्हणाले?
Sule indirectly attacked Ajit Pawar and his supporters during speech
“आजकाल भाषण करतांना काळजी घ्यावी लागते” सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

हेही वाचा – गडकरींच्या एका निर्णयाने राज्यसरकारच्या सहा हजार कोटींची बचत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती येथे बूथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला भावनिक साद घातली. जिल्हाध्यक्ष प्रदीर गारटकर, विश्वनाथ गावडे, बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप, शहाजी काकडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी : मोटारीच्या छतावर बसून ‘स्टंटबाजी’ करणारे दोघे अटकेत

पवार म्हणाले की, सर्वजण एकच आहेत, अशी चर्चा होत आहे. मात्र तसे काही नाही. आगामी निवडणुकीत सर्वजण माझ्याविरोधात एकत्र येतील. मला आणि माझ्या कुटुंबियांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करतील. मात्र बारामतीची जनता माझ्याबरोबर असेल, हा विश्वास आहे. विकास कामांच्या मुद्द्यावरच लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार मी केला आहे. त्याला तुम्ही साथ द्या. निवडणुकीत बारातमीमधील वरिष्ठ भावनिक आवाहन करतील. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. लोकांचे प्रश्न सोडविण्याची धमक माझ्यात आहे. संसदेत भाषणे केली आणि संसदपटू म्हणून गौरविले म्हणजे सर्व प्रश्न सुटले असे होत नाही. बारामतीच्या खासदाराने सेल्फी काढण्यातच वेळ घालविला, अशी टीका त्यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली. लोकसभेसाठीचा आपला उमेदवार नवखा असला तरी मी राजकारणात जुनाच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे पाहूनच मतदान करा. राज्यात आणि देशात कमीपणा आला तर मला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.