पुणे : पुणे जिल्ह्यातील कुरकंभ ओैद्यागिक वसाहतीतील एका कारखान्यातून जप्त करण्यात आलेल्या तीन हजार ६७४ कोटी रुपयांचे मेफड्रोन प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून मुंबईतील अमली पदार्थ विरोधी विभागाकडे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) सोपविण्यात आला आहे. कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतून एक हजार ८२६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी कागदपत्रे एनसीबीकडे सोपविली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेफेड्रोन विक्री, तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी सोमवार पेठेत कारवाई करून गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, साथीदार अजय करोसिया, हैदर शेख यांना पकडले होते. शेख याच्या विश्रांतवाडीतील गोदामात छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन, कच्चा माल जप्त केला होता. तपासात विश्रांतवाडी, सोमवार पेठेतून जप्त करण्यात आलेले मेफेड्रोन कुरकुंभ येथील अर्थकेम कंपनीत तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानतंर कंपनी मालक भिमाजी साबळे, रासायनिक अभियंता युवराज भुजबळ, आयुब मकानदार यांना अटक करण्यात आली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार सुनील बर्मन, अशोक मंडल, शोएब शेख, पप्पू कुरेशी, अली शेख यांना अटक करण्यात आली. मेफेड्रोन प्रकरणाचे मुख्य सूत्रधार सॅम ब्राऊन, संदीप धुनिया असल्याचे निष्पन्न झाले. पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली, सांगली परिसरात छापे टाकून कारवााई केली होती.

हेही वाचा >>>चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कुरकुंभ परिसरातील अर्थकेम कंपनीत तयार करण्यात आलेल्या मेफेड्रोनची तस्करी संदीप धुनिया परदेशात करत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. धुनिया नेपाळमार्गे दुबईत पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली. आतापर्यंत याप्रकरणात एक हजार ८३६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून आंतराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत तीन हजार ६७४ कोटी ३५ लाख ३० हजार रुपये आहे.

संदीप धुनिया पसार

मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया परदेशात पसार झाला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. विश्रांतवाडीतील हैदर शेखने पप्पू कुरेशीला पुणे, महाराष्ट्र, दिल्लीत मेफेड्रोन विक्रीसाठी दिले होते. कुरेशी धुनिया, शोएब शेख यांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात मिळाली होती. कुरेशीने आरोपींच्या मदतीने पुण्यात एक गोदाम भाडेतत्वावर घेतले होते. तिथून पोलिसांनी मेफेड्रोन जप्त केले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happened to the three and a half thousand crore mephedrone case in pune pune print news rbk 25 amy