लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास अवघे काही दिवस राहिले असल्याने थकबाकी वसुलीसाठी महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यातच महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील मिळकतधारकांना तिप्पट कर आकारणी करण्यात आली असून थकबाकी वसुलीची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत समाविष्ट गावातील थकबाकी वसूल करण्यात येऊ नये, अशी सूचना उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला केली आहे.
आणखी वाचा-मोठी बातमी : भोरचे आमदार संग्राम थोपटे खासदार सुप्रिया सुळेंबरोबर!
शासकीय विश्रामगृह येथे अजित पवार यांनी बैठक घेतली. समाविष्ट गावातील नागरिक आणि गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पवार यांना माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर यासंदर्भात बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत थकबाकी वसुली करण्या येऊ नये, असे पवार यांनी सांगितले.