लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी १४५४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. तिन्ही मतदार संघात ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून १६ लाख ६३ हजार ६५४ मतदार तीन आमदार निवडणार आहेत. पहिल्या दोन तासात पिंपरीत ४.४ टक्के, चिंचवडमध्ये ६.८० टक्के , भोसरीत ६.२१ टक्के आणि मावळमध्ये ६.०७ टक्के मतदान झाले आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात लढत हाेत आहे. एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे आणि भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात तगडी लढत हाेत आहे. त्यांच्यासह इतर २१ उमेदवार जनतेचा कौल अजमावत आहेत. भोसरीत भाजपचे महेश लांडगे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात आहेत. तर, मावळमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सुनील शेळके आणि अपक्ष बापू भेगडे यांच्यासह सहा उमेदवार रिंगणात आहेत.
आणखी वाचा-स्वाइन फ्लूमुळे राज्यात ५७ मृत्यू
शहरातील सर्वांत लहान मतदारसंघ पिंपरी आहे. या मतदारसंघात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५०.२१ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा किती टक्के मतदान होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर, राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात २०१९ साली सर्वाधिक ५६.३० टक्के इतके मतदान झाले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर २०२३ साली झालेल्या पोटनिवडणुकीतही या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास होती. या मतदारसंघात मोठ्या वेगाने मतदारसंख्या वाढत असताना मतदानाची टक्केवारी मात्र वाढताना दिसत नाही. यावेळी किती मतदान होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तर, भोसरी मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये काहीशी जागृती झाली असल्याचे दिसून येत आहे. २००९ मध्ये या मतदारसंघात केवळ ४८.१७ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान ६०.९२ टक्के या मतदारसंघात नोंदविले गेले. २०१९ मध्ये हाच आकडा ५९.७१ टक्क्यांवर खाली आला. त्यामुळे यंदा तरी उद्योगनगरीतील मतदानाची टक्केवारी वाढणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा-पुणे: वीज देयकावरील नावात बदल करण्यासाठी ८०० रुपयांची लाच, महावितरणमधील कर्मचाऱ्याला पकडले
मावळातील मतदार मतदानाबाबत सजग
शहराला जोडून असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघाचा बहुतेक भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगर-दर्यांचा दुर्गम असा आहे. तरीही शहरातील मतदारसंघाच्या तुलनेत मावळमधील मतदार अधिक सजग असल्याचे दिसून येत आहेत. या मतदारसंघात सर्वांत कमी मतदान २००९ मध्ये झाले होते. तेही ६५.४१ टक्के इतके होते. या आकड्यांपर्यंत पिंपरी – चिंचवड शहरातील एकही मतदार संघ पोहोचू शकलेला नाही. मावळ मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये ७१ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. आता किती होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.