लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घेऊन बीबीए, बीसीए पदवी अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या महाविद्यालयांनी शुल्काबाबत मनमानी करू नये यासाठी एआयसीटीईने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या अभ्यासक्रमासाठी कमीत कमी किती शुल्क असावे या बाबत समितीकडून शिफारस केली जाणार असून, त्यानुसार मार्गदर्शक शुल्क जाहीर केले जाणार आहे.

pune koyta gang terror marathi news
पुणे: हडपसर भागात पुन्हा कोयता गँगची दहशत; वाहनांची तोडफोड
 Will students of BBA BCA courses get scholarship Pune print news
बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार?
Woman accused escapes from Hadapsar police custody woman police constable suspended
हडपसर पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपीचे पलायन, महिला पोलीस शिपाई निलंबित
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
Big decision for BBA BMS BCA course admissions
बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम प्रवेशांसाठी मोठा निर्णय… आता काय होणार?
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”

एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम यांनी ही माहिती दिली. एआयसीटीईच्या अधिपत्याखाली या शैक्षणिक वर्षापासून बीबीए, बीसीए अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत. मात्र, या अभ्यासक्रमांना आता एआयसीटीईचे निकष लागू होणार असल्याने या अभ्यासक्रमांचे शुल्क वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, एआयसीटीईकडून या अभ्यासक्रमांचे मार्गदर्शक शुल्क जाहीर करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-हडपसर पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपीचे पलायन, महिला पोलीस शिपाई निलंबित

प्रा. सीताराम म्हणाले, की बीबीए, बीसीएसाठीचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना, नियमावलीही करण्यात आली आहे. त्यात पुढील दोन वर्षे बदल होणार आहे. या काळात शिक्षण संस्थांची तपासणीही केली जाणार नाही. मात्र त्या पुढील काळात अभियांत्रिकी, एमबीए महाविद्यालयांप्रमाणे तपासणी केली जाईल. बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांसाठी कमीत कमी शुल्क किती असावे याबाबत शिफारसी करण्याबाबत समिती स्थापन केली आहे. राज्यांनीही शुल्क निर्धारण समितीच्या माध्यमातून शुल्क निश्चित करावे. तसेच मार्गदर्शक शुल्क विचारात घेऊन शुल्काबाबतचे धोरण ठरवावे.