कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमधील सर्व मतदार हे स्टार प्रचारक आहेत .मला जनतेने निवडून आणण्याच ठरविले आहे. ते कोणीही रोखू शकत नाही. किती ही त्यांच्याकडून स्टार प्रचारक आले. तरी पुण्यात अमित शाह आल्यावर जनता माझा प्रबळपणे प्रचार करेल आणि माझ्या पारड्यात मतदान करतील, असा विश्वास कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौर्‍यावर येणार असून ते कसबा मतदारसंघात येणार आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरे, अजित पवारांसह अनेकांचे फोन आले, पण मी माघार घेणार नाही, कारण…”, राहुल कलाटेंच्या घोषणेने मविआला धक्का

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी


कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर भाजपकडून हेमंत रासने, महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर, बिग बॉस फेम अभिजीत बिचकूले,संभाजी ब्रिगेडकडून अविनाश मोहिते, आम आदमी पार्टीकडून किरण कद्रे आणि हिंदू महासंघाकडून आनंद दवे यांनी अर्ज दाखल केले होते.यामुळे या निवडणुकीत खरी रंगत आली होती.मात्र आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्या दिवशी संभाजी ब्रिगेडकडून अविनाश मोहिते, आम आदमी पार्टीकडून किरण कद्रे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपकडून हेमंत रासने, महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर या दोघांमध्ये ही लढत पाहण्यास मिळणार आहे. तर त्याच दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर रविंद्र धंगेकर यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा- पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक : सचिन अहीर यांनी घेतली बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची भेट; म्हणाले, “आज…”

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि कसब्यात रवींद्र असा ट्रेंड सोशल मीडियावर पाहण्यास मिळत आहे. त्या प्रश्नावर रविंद्र धंगेकर म्हणाले की, कार्यकर्ते अशा प्रकारची चर्चा करीत आहे. केंद्रात राहुलजी, महाराष्ट्रात महाआघाडी आणि पुण्यात आम्ही सर्वजण असल्याची भूमिका धंगेकर यांनी व्यक्त केली.

येथून पुढील आम्ही सर्व निवडणुका लढणार

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी किरण कद्रे यांनी अर्ज दाखल केला.मात्र यापूर्वी आमच्या पक्षाने पोटनिवडणुक लढवली नव्हती.तसेच सध्याची अनिश्चितता लक्षात घेता,आम्ही या निवडणुकीमधून माघार घेत आहे.पण यापुढील सर्व निवडणुका लढणार आहे.अशी माहिती आम आदमी पार्टीचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी दिली.

हेही वाचा- पोटनिवडणूक न लढवण्याचा आम आदमी पक्षाचा निर्णय; कसबा पोटनिवडणूकीतून माघार

शिवसेनेकडून ‘तो’ शब्द दिल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला

कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्याच्या दृष्टीने संभाजी ब्रिगेडकडून सर्व तयारी झाली होती.मात्र आमची शिवसेने सोबत युती आहे. तसेच शिवसेनेची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी आहे. हे सर्व लक्षात घेता, आगामी महापालिका निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला सन्मान दिला जाईल असा शब्द शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी दिला आहे.आमच्या पक्षातील वरीष्ठ नेत्यासोबत चर्चा केल्यानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader