पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही बाजूने बारामती येथे जोरदार प्रचार सुरू झाला आहे. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यात भाजपचे नेते आशिष शेलार हे आले होते. त्यावेळी राज्यातील अनेक घडामोडी बाबत त्यांनी भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील ४८ पैकी ४५ जागा महायुती जिंकणार असल्याचे महायुती च्या नेत्याकडून सांगितले जात आहे. तर त्या ४५ जागांमध्ये बारामतीची जागा असणार का त्या प्रश्नावर आशिष शेलार म्हणाले की, बारामतीमध्ये सुनेत्रा ताई यांचा पराभव निश्चित होणार असे विधान केले.

आणखी वाचा-शरद पवारांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “तुतारीसमोरचं बटण दाबा, कसं दाबायचं ते काल कुणीतरी…”

आशिष शेलार यांच्या लक्षात चूक येताच सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असल्याचे सांगत बाजू सावरून घेत पुढे म्हणाले की, बारामतीमध्ये बदल होईल. सुप्रिया सुळे याचा पराभव नक्की होईल, किती मताने होईल हे सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When bjp leader ashish shelar accidently said sunetra pawars defeat in baramati know what happen exactly svk 88 mrj