पिंपरी- चिंचवड : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात जातीय तणाव निर्माण केला जातो. षड्यंत्र रचलं जातं. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. असं मत माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमर साबळे यांनी भीमा कोरेगाव आणि कोपर्डी येथील उदाहरणे दिली. परभणी येथे सध्या जातीय तणाव पाहायला मिळतो आहे. सध्या तिथं शांतता आहे.

अमर साबळे म्हणाले, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. ते मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस हे जेव्हा- जेव्हा मुख्यमंत्री झाले. तेव्हा महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र केलं जातं, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने लक्षात ठेवावं. पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील भीमा कोरेगाव यासारखी घटना घडली होती.

आणखी वाचा-इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात

कोपर्डी येथील घटनेनंतर आंदोलन झाली होती. तेव्हा देखील जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. यावरून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर जातीय तणाव निर्माण केला जातो असा इतिहास आहे. असं अमर साबळे यांनी मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे. महाराष्ट्रात शांतता नांदावी आणि जातीय तणाव निर्माण न होण्याच्या बाजूने महायुती सरकार असणार आहे.

Story img Loader