लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, नगरमधील पारनेर आणि नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या तालुक्यांना रविवारी गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके, भाजीपाल्यांसह द्राक्ष, डाळिंब, पपई, केळीच्या बागांना मोठा फटका बसला आहे. आज, सोमवारी पश्चिम विदर्भात गारपीट होण्याचा, तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या चार तालुक्यांना आणि पुण्यातील आंबेगाव आणि नगरमधील पारनेर तालुक्याला गारपिटीचा फटका बसला आहे. गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्ष, डाळिंब, पपई, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबेगावमध्ये गारांचा खच पडला होता. नाशिकमध्ये गारपिटीसह संततधार सुरू होती. संततधार पावसामुळे द्राक्षबागांमध्ये फळकुज आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. डाळिंबावर तेल्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. पपई आणि केळीला गारांचा मार लागून पिके खराब झाली आहेत.

आणखी वाचा-पुणे : रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवांशाचे सलग दुसऱ्या दिवशी हाल

सातारा आणि परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. सातारा शहरासह वाई, जावली, महाबळेश्वर, पाचगणी व उत्तर साताऱ्याच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने सातारा शहरात सर्वत्र पाणी साठले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. सध्या भाताची काढणी सुरू असून, काढून ठेवलेला भात भिजल्यामुळे काळा पडण्याचा धोका आहे. वाई आणि महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी पिकांचेही नुकसान झाले आहे. रविवारी कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

आणखी वाचा-दूध दरवाढीसाठी इंदापुरात रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांचा रास्ता रोको

रब्बीसाठी पाऊस पोषक

गारपीट आणि अवकाळी पाऊस द्राक्ष, डाळिंब, पपई, केळी, पेरू स्ट्रॉबेरी या फळपिकांसाठी नुकसानकारक आहे. राज्यात फळबागांचे क्षेत्र मोठे असल्यामुळे मोठ्या नुकसानीची भीती आहे. पण हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिकांच्या वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होणार आहे. पाण्याअभावी अडचणीत आलेल्या कोरडवाहू पिकांना संजीवनी मिळणार आहे.

ऑरेंज अलर्ट – अकोला, बुलडाणा, वाशिम (पाऊस, गारपीट)

यलो अलर्ट – पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ (हलका ते मध्यम पाऊस)