पुणे : अनैतिक संबंधातून प्रियकराबरोबर पसार झालेल्या महिलेने घरातील रोकड आणि साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पतीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रियकर आणि पत्नीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने फिर्यादीच्या पत्नीशी जवळीक साधून अनैतिक संबंध निर्माण केले. फिर्यादीच्या मुलीची उंची वाढविण्यासाठी व्यायाम प्रकार घेतो, असे सांगून त्याने जवळीक साधली होती. आरोपी तरुणाने फिर्यादीच्या मुलीशी अश्लील कृत्य करून विनयभंग केला. या प्रकाराची कोणाला माहिती देऊ नको, असे सांगून आरोपी तरुणाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला धमकावले होते.
हेही वाचा – पिंपरी : पळून जाणाऱ्या सराइत गुन्हेगाराला पोलिसांनी पाठलाग करत पकडले; दोन पिस्तुल जप्त
फिर्यादीच्या पत्नीशी अनैतिक संबंध निर्माण केल्यानंतर त्याने पत्नीला पळून जाण्यासाठी फूस लावली. पत्नीने घरातील ५० हजार रुपये, साडेपाच तोळ्यांचे दागिने तसेच माहेरच्या घरातून ३० हजार रुपये चोरले. पत्नी प्रियकरासह पसार झाली. पत्नी पसार झाल्यानंतर पतीने पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, प्रियकराने मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पतीने दिली. वारजे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.