पिंपरी- चिंचवडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकरत्यांनी जल्लोषात स्वागत केले. शहरातील मुकाई चौक रावेत येथे अजित पवार येताच फटाक्यांच्या आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात मोठं स्वागत झालं. त्यानंतर सुरु झालेल्या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे बुलेटच्या ताफ्यासह सहभागी झाले होते. बुलेटच्या सायलन्सरमधून कर्कश्य, फाडफाड आवाज काढत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडत वाहतूक नियमांचा आणि ध्वनीबाबत असलेल्या नियमांचा भंगही केला. हा सर्व प्रकार पोलिस अधिकाऱ्यांच्या समोरच सुरु होता. तेव्हा अशा या उत्साही कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महापालिकेतील आढावा बैठकीकडे शिवसेना खासदार, भाजपा आमदारांची पाठ
हेही वाचा… उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरीत; साडेपाचशे किलोच्या पुष्पहाराने आणि फुलांची उधळण करत जोरदार स्वागत
एरवी सर्वसमान्यांच्या अशा गाड्यांवर किंवा ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या कार्यक्रमांवर पोलीस तात्काळ कारवाई करत असल्यांचं चित्र आहे. मात्र आता समोरच ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची हिंमत पोलीस दाखवणार का याची शहरात नागरीकांमध्ये सुरु झाली आहे.