सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे दुचाकीचालक हेल्मेट न घालता वाहन चालवतील त्यांच्यावर कारवाई सुरुच राहणार असल्याचे वाहतुक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेल्मेटसक्तीविरोधात पुणेकरांनी गुरुवारी शहरात निषेध रॅलीचे आयोजन केले होते. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांनी केलेल्या सुचनांवर विचार केला जाईल, असे सांगताना हेल्मेट सक्तीविरोधात काढण्यात आलेल्या या रॅलीत सहभागींवरही कारवाई करण्यात आल्याचे डीसीपी सातपुते यांनी सांगितले.

पुणे शहरात १ जानेवारीपासून हेल्मेट न घालणार्‍या दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ आज पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीकडून सविनय कायदेभंग दुचाकी निषेध रॅली काढण्यात आली. रॅली संपल्यानंतर हेल्मेट सक्ती होता कामा नये या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांना देण्यात आले.

या रॅलीमध्ये कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मनसे नेत्या रूपाली पाटील तसेच विविध संघटनांचे लोकप्रतिनिधी या रॅलीत सहभागी झाले होते.