पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी तिघांना अटक केली. आतापर्यंत मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. मोहोळच्या खुनाच्या कटात तिघे जण सामील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
आदित्य गोळे, नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेकडून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मोहोळचा खून करण्यापूर्वी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने मुळशीतील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी तेथे नितीन खैरे होता. खैरेने मोहोळच्या खुनासाठी पैसे पुरविल्याचे तपासात उघडकीस आले अहे.
हेही वाचा – मार्केट यार्ड परिसरात आंबेडकरनगर झोपडपट्टीत मोठी आग
हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘या’ अधिकाऱ्याला दिली पुणे जिल्हाधिकारी पदाची ऑफर
गोळेने पोळेकरसह साथीदारांना पिस्तूल खरेदीसाठी पैसे दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात ५ जानेवारी रोजी भरदिवसा मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणात पोळेकर, त्याचा मामा नामदेव कानगुडे याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे.