पुणे : भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे विरुद्ध महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे अशी थेट लढत झाली आहे. सहज वाटणारी लढत महेश लांडगे यांच्यासाठी कडवं आव्हान ठरल्याचं बोललं जात आहे. भोसरी मतदारसंघातून अजित गव्हाणे यांचं पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे. काही तासांमध्ये अधिकृतरित्या निकाल लागणार आहे. असं असलं तरी भोसरीमध्ये तुतारी वाजणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ती टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप, महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना अत्यंत सहज आणि सोपी वाटणारी निवडणूक अत्यंत आव्हानात्मक गेल्याचं बोललं जात आहे. अजित गव्हाणे यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप करत टीका देखील केली. गव्हाणे यांच्या टीकेला आमदार महेश लांडगे यांनी उत्तर देण्यास टाळले. परंतु, दिघी मधील एक सभा कलाटणी देणारी ठरल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या दिघी येथील जाहीर सभेत आमदार महेश लांडगे यांनी वीस तारखे नंतर डोळ्यासमोर महेश लांडगे ठेवा, निवडणूक माझा पिंड नाही. असं म्हणत महेश लांडगे यांनी विरोधकांना तंबी दिली होती. तंबी नंतर भोसरी विधानसभा मतदारसंघातील वातावरण बदलल्याचं बोललं जात आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का, मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
Bala Nandgaokar : बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…”
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी…”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले…
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results in Marathi
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
Shivsena Thackeray vs SHinde in 49 constituencies
‘हे’ ५१ मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची, ठाकरे – शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

आणखी वाचा-‘महानिर्वाण’ने गाठली पन्नाशीची उमर

महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांनी देखील या वक्तव्याची दखल घेऊन महेश लांडगे यांच्यावर टीका केली होती. तंबीच्या विधानाआधी आमदार महेश लांडगे यांच्या बाजूनं वातावरण होत. असं बोललं जात आहे. महेश लांडगे यांच्यासाठी भोसरी मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी शरद पवार यांनी मैदानात उतरत अजित गव्हाणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याच आवाहन मतदारांना केलं होतं. यावर्षी भोसरी मतदारसंघात ६१.५४टक्के मतदान झाला आहे. गेल्या पंचवार्षिक म्हणजे २०१९ ला मतदानाच्या टक्केवारीचा आकडा ५९.७१ इतका होता. यावेळी एक टक्क्याची वाढ झालेली ही आकडेवारी कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा-मावळमध्ये प्रसिद्ध बैलगाडा मालकाची ५० लाखांच्या खंडणीसाठी हत्या; नेमकं प्रकरण काय?

भोसरी मतदारसंघात कुणी किती मतदान केले याची आकडेवारी

  • पुरुष – १ लाख ९९ हजार ३०
  • महिला – १ लाख ७५ हजार ३७९
  • इतर – १५
  • एकूण – ३ लाख ७४ हजार ४२४ मतदान झाले आहे.
  • मतदानाचा टक्का हा ६१.५४ वर पोहचला आहे.