पुणे : पुण्यात यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत एकूण १ लाख ७२ हजार घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत २५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. घरांच्या विक्रीत वाढ होत असताना त्यातील परवडणाऱ्या घरांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर महिन्यात परवडणाऱ्या घरांचे प्रमाण ३ टक्क्यांनी कमी झाले आहे.

नाइट फ्रँक इंडियाने पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. या अहवालानुसार, यंदा नोव्हेंबरमध्ये एकूण १३ हजार ३७१ घरांची विक्री झाली. त्यात २५ लाख रुपयांपर्यंत किमतीच्या घरांचे प्रमाण २१ टक्के असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १ टक्का घट झाली आहे. याचबरोबर २५ ते ५० लाख रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण ३३ टक्के असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी घटले आहे. म्हणजेच, परवडणाऱ्या घरांचे प्रमाण एकूण ३ टक्क्यांनी कमी झाले आहे. याचवेळी ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण सर्वाधिक ३२ टक्के आहे. यंदा १ ते २.५ कोटी रुपयांच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण १४ टक्के असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्के वाढ झाली आहे. याचबरोबर २.५ ते ५ कोटी रुपयांच्या घरांचे प्रमाण १ टक्क्यावरून २ टक्क्यांवर पोहोचले आहे. पुण्यात ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची विक्री १ टक्क्यापेक्षा कमी आहे.

Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
CIDCO houses expensive navi mumbai, president Sanjay Shirsat
घरांचे दर ठरविताना अध्यक्षांना विश्वासात घेतले नव्हते का? सिडकोच्या सोडत प्रक्रियेतील संतप्त अर्जदारांचा सवाल
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
CIDCO announced rates of 26 thousand houses in Navi Mumbai
परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक्
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…

आणखी वाचा-पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन

पुण्यात मध्यम आकाराच्या घरांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात विक्री झालेल्या घरांमध्ये ५०० ते ८०० चौरस फुटांच्या घरांचे प्रमाण ४५ टक्के आहे. याचवेळी ५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांचे प्रमाण २३ टक्के आहे. तसेच, ८०० ते १ हजार चौरस फुटांच्या घरांचे प्रमाण १४ टक्के, १ ते २ हजार चौरस फुटांच्या घरांचे १५ टक्के आणि २ हजारांहून अधिक चौरस फुटांचे ३ टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

घरांची विक्री

नोव्हेंबर २०२३ – १४,९८८
नोव्हेंबर २०२४ – १३,३७१

आणखी वाचा-लघुउद्योजकांसाठी खुशखबर! सरकारच्या वतीने कामगिरीचा होणार गौरव; योजनेविषयी सविस्तर जाणून घ्या…

एकूण विक्रीत २५ टक्के वाढ

यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात एकूण १ लाख ७२ हजार ६७७ घरांची विक्री झाली. त्यातून सरकारला ६ हजार ४७९ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. गेल्या वर्षी याच कालावधीत १ लाख ३७ हजार घरांची विक्री झाली होती आणि त्यातून ४ हजार ७९१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. तसेच, २०२२ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान १ लाख २५ हजार ७०२ घरांची विक्री होऊन ४ हजार ३४४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घरांच्या विक्रीत सुमारे २५ टक्के आणि मुद्रांक शुल्क संकलनात सुमारे ३५ टक्के वाढ झालेली आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेची सातत्यपूर्ण वाढ सुरू आहे. ग्राहकांकडून घरांना मागणी वाढत असून, उत्पन्नातील वाढ, अर्थसाहाय्याचे पर्याय आणि पायाभूत सुविधांचा वेगाने होत असलेला विकास ही कारणे यामागे आहेत. मोठ्या घरांकडे ग्राहकांचा कल असून, दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून खरेदी केली जात आहे. -शिशीर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया

Story img Loader