लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरालगत उद्योग वाढविले, आयटीपार्क आणले. हजारो लोकांना काम दिले. आता मात्र या शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत आहे. पाणी, वीज, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांबाबत गेल्या काही वर्षात हवे तसे काम झाले नाही. सत्ताधारी भाजप उद्योगांना हव्या त्या सुविधा देऊ शकले नाहीत. परिणामी, ३० ते ३५ कंपन्या हिंजवडीतून बाहेर गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar Slams Raj Thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vadgaon sheri vidhan sabha election 2024
पुणे: अटीतटीच्या सामन्यात ‘मैत्री’ निर्णायक? ‘या’ मतदार संघात आहे असे चित्र!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Amit thackeray and mitali thackeray
Amit Thackeray Love Story : “मी पोद्दारचा, ती रुईयाची, ती ज्या मुलाला बघायला जायची…”; अमित ठाकरेंनी सांगितली लव्हस्टोरी!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. माजी खासदार नाना नवले, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संजोग वाघेरे, तुषार कामठे, कैलास कदम, नवनाथ जगताप यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद

पवार म्हणाले, की एके काळी देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांचे राज्य होते. मात्र, काही ठराविक लोकांच्या हातामध्ये सत्ता आली. त्यामुळे गेली दहा वर्ष महाराष्ट्राचे चित्र काही चांगले नाही. काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील विकास पाहण्यासाठी बाहेरील लोक येत होते. आता तसे चित्र राहिले नाही. आम्ही उद्योग वाढविले, आयटीपार्क आणले. हजारो लोकांना काम दिले. मात्र, आता या शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणी, वीज, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधाबाबत गेल्या काही वर्षात हवे तसे काम झाले नाही. त्यामुळे ३० ते ३५ कंपन्या हिंजवडीतून बाहेर गेल्या. हजारो लोकांचा रोजगार गेला. हे न शोभणारे चित्र आहे. त्यात दुरूस्ती करणे गरजेचे आहे. ज्यांच्या हातात दहा वर्ष सत्ता होती, त्या लोकांनी सत्तेचा विनियोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केला नाही. त्यामुळे आज ही अवस्था आली आहे. ही अवस्था बदलण्यासाठी परिवर्तन, सत्तेत बदल करणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले.

आणखी वाचा-पुणे: अटीतटीच्या सामन्यात ‘मैत्री’ निर्णायक? ‘या’ मतदार संघात आहे असे चित्र!

जगतापांच्या विश्वासू समर्थकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

सांगवी परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक आणि जगताप कुटुंबाचे विश्वासू अशी ओळख असलेले अंबरनाथ कांबळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.