पुणे : चाकण येथे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तीन वर्षे न्यायालयाने जामीन मंजूर केला नव्हता. ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर अमली पदार्थ तस्कर ललित पाटील घाबरला होता. आयुष्यभर कारागृहात राहावे लागणार, अशी भीती वाटल्याने ससून रुग्णालयातून पसार झाल्याची कबुली ललितने पोलीस चौकशीत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह साथीदारांना मुंबई पोलिसांच्या ताब्यातून घेण्यात आले. ललितसह साथीदार शिवाजी शिंदे, राहुल पाठक यांना अटक करून बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ललितसह साथीदारांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

हेही वाचा – औषधनिर्माणशास्त्र पदवीच्या ३३ टक्के जागा रिक्त; गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट प्रमाण

चाकण पोलीस ठाण्यात २०२० मध्ये अमली पदार्थ विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यात जाामीन मिळवण्यासाठी ललित प्रयत्न करत होता. ललितचा भाऊ भूषण जामिनासाठी प्रयत्न करत होता. दिल्लीत एका वकिलाची भूषणने भेट घेतली होती. चाकणमधील गुन्ह्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आयुष्यभर कारागृहात रहावे लागणार असल्याची भीती ललितला वाटत होती. भीतीपोटी ससून रुग्णालयातून पसार झाल्याची कबुली ललितने पोलिसांना दिली, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.