पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल दरवाढीविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी मागे का घेतली? कुणाच्या सांगण्यावरून घेतली असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिकिया आली आहे. याचिका मागे घेण्यामागे काही ‘सेटलमेंट’ झाली आहे, असे मी म्हणणार नाही, असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले.
टोल दरवाढीविरोधात मनसे नेते राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या टोल दरवाढीविरोधात येत्या दोन चार दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टोल दरवाढीविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी मागे का घेतली? असा प्रश्न केला होता.
हेही वाचा – पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन
यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी टोल वसुलीविरोधातील याचिका मागे घेतली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय चर्चा झाली असेल. त्यामुळे याचिका मागे घेतली असेल. यामध्ये ‘सेटलमेंट’ झाली आहे, असे मी म्हणणार नाही. टोल प्रकरणात माझा फार अभ्यास नाही.