राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या आदित्य ठाकरेंचा राज्यात परतीच्या पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरा सुरू आहे. यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (मंगळवार) प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना निशाणा साधला.

नक्की पाहा – PHOTOS : पुण्यात लुल्लानगर परिसरात सातव्या मजल्यावरील ‘Vegeta’ हॉटेल जळून खाक

BJP MLA Brajbhushan Rajput viral video
Video: ‘मी तुम्हाला मत दिलंय, आता तुम्ही…’, लग्न खोळंबलेल्या तरुणानं भाजपा आमदाराकडं केली अजब मागणी, व्हिडीओ व्हायरल
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
jitendra awhad bishnoi gang,
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आव्हाडांचे कार्यकर्ते सावध, एप्रिल महिन्यात आव्हाड यांनाही आली होती बिष्णोई टोळीची धमकी
Raj thackeray on Baba Siddique
Raj Thackeray : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बाहेरच्या राज्यातून…”
Ratan Tata Died at 86 in Marathi
Raj Thackeray Letter To PM : “रतन टाटा हयात असतानाच भारतरत्न द्यायला हवा होता, पण…”, राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
Loksatta vyaktivedh Madhura Jasraj Paraphrase of V Shantaram autobiography movie
व्यक्तिवेध: मधुरा जसराज
Controversy over ministership in Shiv Sena
शिवसेनेतील मंत्रिपदाची रस्सीखेच चव्हाट्यावर

अब्दुल सत्तार म्हणाले, “मी आदित्य ठाकरेंचा दौरा पाहिला, त्यांच्या वडिलांचाही दौरा पाहिला, अडीच तासांचा दौरा आणि त्यामध्ये २४ मिनिटे शेतकऱ्यांच्या बांधावर. आम्ही २४ दिवसांपासून फिरत आहोत परंतु ओल्या दुष्काळाची परिस्थिती आतापर्यंत आम्हाला दिसली नाही. त्यांना २४ मिनिटांमध्ये काय दिसलं असेल मला माहीत नाही. परंतु राजकारणासाठी बांधावर जाऊन फोटो काढणं वेगळं आहे आणि शेतकऱ्यांच्या मनापर्यंत जाणं वेगळं असतं.”

हेही वाचा – Shivshahi bus caught fire : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात शिवशाही बसला भीषण आग

याचबरोबर शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आदित्य ठाकरेंकडून सातत्याने गद्दार संबोधले जात असून, हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढा, असं आव्हान दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सिल्लोडमधून मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि आदित्य ठाकरेंनी वरळीमधून राजीनामा द्यावा, असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात आज प्रसारमाध्यमांना बोलताना सत्तार यांनी सांगितले की, “माझं आवाहन हे मुख्यमंत्र्यांकडे काही वेळेसाठी अडलेलं आहे. त्यांना(आदित्य ठाकरेंना) मी म्हणालो होतो की तुम्ही तिथून राजीनामा द्या, मी सिल्लोडमधून राजीनामा देतो. त्याचं वक्तव्य होतं की, तुम्हाला दोन वर्षानंतर माहीत पडले की निवडणूक काय असते. मी म्हणालो दोन वर्षे कशाला वाट बघता, पहिले आपल्या दोघांची ट्रायल मॅच होऊ द्या. तुम्ही तिकडून राजीनामा द्या, मीपण राजीनामा देतो आणि ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ लगेच होईल. अजूनही आपलं आव्हान आहे आणि त्यांनी नाही दिला तरी मला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली. तर आठवभराच्या आत तुम्हाला वृत्तवाहिनीवर माझी बातमी दिसेल.”

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भूमरे यांच्या उपस्थितीत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे येथे हॉर्टिकल्चर व्हॅल्यू चेन फंक्शन या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्धाटन तोमर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते.