पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. दगडू शेठ गणपतीचे दर्शन घेऊन, अभिषेक आणि महाआरती करून मोदी आता कार्यक्रम स्थळी पोहोचे असून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हा पुरस्कार मोदींना का देण्यात येतोय, याबाबतची माहिती लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांनी प्रस्तावात नमूद केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र, आधुनिक आणि बलाढ्य हिंदुस्थानचे स्वप्न पाहिले. राष्ट्रीयत्व, पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी अर्थकारण लोकमान्यांनी सांगितले होते. ते सूत्र नरेंद्र मोदींच्या लोककल्याणकारी बलाढ्य राष्ट्रात आम्हाला दिसले. त्यातच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण त्यांच्या कार्यक्रमात आढळतात. म्हणूनच आम्ही केलेली निवड तुम्हा सर्वांना भावेल असा विश्वास. हा पुरस्कार स्वीकारला म्हणून आभार मानतो”, असं दीपक टिळक म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why was modi selected for the lokmanya tilak award deepak tilak said ancient lore sgk