पुणे : ‘तू सुंदर दिसत नाहीस. तू वेडसर आहेस’, असे टोमणे मारणाऱ्या अनिवासी भारतीय पतीच्या विरुद्ध अखेर पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्या पतीविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पवन योगराज ग्रोवर (वय ४३, रा. सेरेना साेसायटी, बाणेर, सध्या रा. जर्मनी) असे गु्न्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत ग्रोवरच्या पत्नीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुरंदर विमानतळ घेणार ‘उड्डाण’, मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांनी घेतला आढावा

तक्रारदार महिलेचा पवन ग्रोवरशी २००६ मध्ये झाला होता. ग्रोवर सध्या जर्मनीत वास्तव्यास आहे. ‘तू सुंदर दिसत नाहीस. तू वेडसर आहेस. तुझ्यापेक्षा जर्मनीतील घरकाम करणाऱ्या महिला सुंदर दिसतात’, असे बोलून मानसिक त्रास देणाऱ्या ग्रोवरने पत्नीला मारहाण करीत माहेरी निघून जाण्यास सांगितले. ग्रोवरच्या छळामुळे पत्नीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पत्नीला धमकावणे, शिवीगाळ करणे तसेच छळ केल्या प्रकरणी ग्रोवरच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.