पुणे : संसारात प्रेयसी हस्तक्षेप करत असल्याने प्रियकराने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना कोंढवा भागात घडली. प्रियकराने प्रेयसीचा मृतदेह लटकावून तिने गळफास घेतल्याचा बनाव रचला. वैद्यकीय अहवालात प्रेयसीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फातिमाबी शेख (वय ३४, रा. कोंढवा खुर्द) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रईस हनीफ शेख (वय ४०) आणि त्याची पत्नी शबाना (वय ३५, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फातिमाबी आणि रईस यांचे प्रेमसंंबंध होते. फातिमाबी संसारात हस्तक्षेप करत असल्याने प्रियकर रईस आणि पत्नी शबाना यांनी फातिमाबीचा खून करण्याचा कट रचला. तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर फातिमाबीचा मृतदेह लटकावून तिने गळफास घेतल्याचा बनाव रचला. रईसने फातिमाबीला ससून रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणूक: बंडखोर राहुल कलाटे यांचे समर्थक आणि भाजपा समर्थक एकमेकांना भिडले

हेही वाचा – Kasba By Election : मतदान यादीतील नावाचा गोंधळ

वैद्यकीय तपासणीत फातिमाबीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोंढवा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संशयावरून रईस आणि त्याची पत्नी शबाना यांची चौकशी केली. चौकशीत दोघांनी फातिमाबीचा खून केल्याची कबुली दिली. पाेलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.