लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या आवारात वणवा पेटल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

आणखी वाचा-आरटीई कायद्यातील बदलांबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “…तरच खासगी शाळांत प्रवेश”

डेक्कन कॉलेजचे आवार प्रशस्त आहे. आवारात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. उन्हामुळे झाडे सुकली आहेत. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास डेक्कन कॉलेजच्या आवारात वणवा पेटला असून, मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याची माहिती येरवडा येथील अग्निशमन दलाच्या केंद्राला मिळाली. जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बँब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.