पिंपरी : मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वेक्षणाच्या माध्यमातून आमचे काम सुरू आहे. ज्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल. त्याबाबत वरच्या पातळीवर बोललो तर त्या पक्षाला जागा मिळतील. सर्वेक्षणामध्ये भाजप विजयी होईल असे दिसत असेल तर भाजप त्या ठिकाणी ताकदीने लढेल. मित्र पक्ष विजयी होत असेल तर त्यांच्यासाठी ताकदीने लढू आणि जागा जिंकू असे सांगत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सर्वेक्षणावर कोणता पक्ष लढेल हे ठरेल,असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ३० मे ते ३० जून दरम्यान लोकसभा मतदारसंघा मध्ये ‘विशेष जनसंपर्क अभियान (मोदी@9)’ संपन्न होत असून त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.
शिरूरमधून मागीलवेळी भाजप-शिवसेना युतीकडून लढलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. बाळा भेगडे म्हणाले, आम्ही राज्यात सत्तेत जरी असलो तरी येणाऱ्या काळात पार्लमेंटरी बोर्डात जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल. युतीचा निर्णय, मतदारसंघ ज्या पक्षाला जाईल, त्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणणे आणि २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सूत्रे देने ही भाजपच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण केले आहे का, सर्वेक्षणात भाजपला अनुकूल असेल तर दावा करणार का याबाबत विचारले असता भेगडे म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभा प्रवासाचा संयोजक म्हणून काम करताना मावळ, शिरूरमध्ये सर्वेक्षणाच्या माध्यमातून आमचे काम चालू आहे. ज्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल. त्याबाबत वरच्या पातळीवर बोललो तर त्या जागा विजयी होणाऱ्या पक्षाला मिळतील आणि आम्ही त्या ठिकाणी निवडणूका लढवू.
हेही वाचा >>> अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; पिंपरीतून ४१ किलो गांजा जप्त
सर्वेक्षणामध्ये जी जागा जो पक्ष विजयी होईल असे दिसेल. जर भाजप उमेदवार विजयी होईल असे दिसत असेल तर भाजप त्या ठिकाणी ताकदीने लढेल. मित्र पक्ष विजयी होत असेल तर त्यांच्यासाठी ताकदीने लढू आणि जागा जिंकू असेही भेगडे म्हणाले. मावळ लोकसभा मतदारसंघातील जाहीर सभा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे. २५ जून रोजी वाल्हेकरवाडी येथे जाहीर सभा घेतली जाणार आहे. दरम्यान, शिरूरमधून लढण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का असे भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना विचारले असता मी २०१९ मध्येच इच्छुक होतो असे सांगत लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत दिले.