पुणे : गणेशोत्सवातील गैरप्रकार टाळण्यासाठी मध्यभागातील मद्य विक्री दुकाने, तसेच मद्यालये विसर्जन मिरवणुकीपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी नुकतेच दिले. मद्य विक्री दुकाने आणि मद्यालये बंद करण्याचा निर्णय एकतर्फी घेण्यात आला असून, मद्य विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. मद्य विक्री बंदीमुळे शहरातील गुन्हे कमी होणार आहेत का, असा प्रश्न मद्य विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. गणेश मंडळांनी मात्र मद्य विक्री बंदीचा निर्णयाचे स्वागत केले असून, पुढील वर्षी उत्सवाच्या काळात संपूर्ण पुणे शहर आणि जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

गणेशोत्सवापूर्वी प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. उत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्यभागातील मद्य विक्री दुकाने, तसेच मद्यालये बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केली. गणेशोत्सवात मद्य विक्री बंद करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांनी जिल्हाधिकारी दिवसे यांच्याकडे पाठविला. या प्रस्तावास मंजुरी देऊन दिवसे यांनी खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याने मद्य विक्रेते, बार आणि रेस्टाेरंट चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

pimpri chinchwad vote counting
पिंपरी : मतमोजणीसाठी पिंपरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; किती पोलीस असणार तैनात?
pune vidhan sabha police force
पुण्यात मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त… किती पोलिसांची फौज तैनात?
pune district vote counting
पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील मतमोजणी कधी पूर्ण होणार ? प्रशासनाची तयारी काय ?
ggy 03 pune administration important information on pimpri chinchwad bhosari maval constituency result
पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळचा निकाल कधीपर्यंत येणार हाती? प्रशासनाने दिली महत्वाची माहिती
New admission certificate required for MPSC joint preliminary examination to be held on December 1
एमपीएससीतर्फे १ डिसेंबरला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नवे प्रवेश प्रमाणपत्र आवश्यक… काय आहेत मार्गदर्शक सूचना?

हेही वाचा : सावधान! गणेशोत्सवात ढोल-ताशा, डीजे, स्पीकरच्या भिंतीजवळ जाताय… आधी धोके जाणून घ्या…

‘प्रशासनाचा आदेश एकतर्फी असून, मद्य विक्रेत्यांचे मत जाणून घेतले नाही. मद्य विक्री बंद केल्यानंतर गुन्हेगारी आणि गैरप्रकार खरंच कमी होतील का,’ असा प्रश्न बार आणि रेस्टोरंट चालक सुनील कुंजीर यांनी उपस्थित केला आहे.

मध्यभागातील मद्य विक्री दुकाने

वाईन शाॅप – १०

परमिट रुम – ३२

बिअर शाॅपी – १०

देशी दारू दुकाने – १०

एकूण दुकाने – ६१

मद्य विक्रेत्यांच्या तक्रारी काय?

मद्य विक्री, बार आणि रेस्टोरंट व्यवसायावर अनेकजण अवलंबून आहेत. दरवर्षी मद्य विक्री परवान्यापोटी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे शुल्क जमा करावे लागते. परमिट रुम चालकांना वार्षिक साडेनऊ लाख रुपये शुल्क भरावे लागते. बिअर शाॅपीला चार लाख रुपये, देशी दारू विक्रेत्यांना सात लाख रुपये, तसेच वाईन शाॅपचालकांना वार्षिक १९ लाख रुपये शुल्क भरावे लागतात. लोकसभा निवडणुकीत मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीतही मद्य विक्री दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. मद्य विक्री दुकानातील कामगारांचे पगार, वार्षिक खर्च, शुल्क या बाबी विचारात न घेता एकतर्फी मद्य विक्री बंदी लादल्याची तक्रार मद्य विक्रेत्यांनी केली आहे.

हेही वाचा : सायबर चोरट्यांमुळे लष्करी जवानाला मनस्ताप- ५२५ रुपयांसाठी अडीच हजार किलोमीटरचा प्रवास

मद्य विक्री बंदीचा घोळ

टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील एका बाजूचा समावेश खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतो. तेथील दुकाने बंद आहेत. समोरील बाजूचा समावेश स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतो. २५ फूट अंतरावरील मद्य विक्री दुकान सुरू आहे.

उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी मद्य विक्री बंदीची मागणी प्रमुख मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत केली होती. मद्य विक्री बंदीचा निर्णय चांगला आहे. पुढील वर्षी उत्सवाच्या काळात संपूर्ण पुणे शहर आणि जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत.

बाळासाहेब मारणे, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, विश्वस्त, अध्यक्ष