बारामती : ‘जय दादा तुम्ही आता बारामतीत सक्रिय व्हायला हवे. आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे तुम्ही आता बारामतीत यायला पाहिजे, असा प्रेमळ आग्रह बारामतीतील कार्यकर्त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांना केला. ’यासंदर्भात तुन्हीच अजितदादांना विचारा. त्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यावर मी लगेचच कामाला लागतो’, अशी ग्वाही जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामतीमध्ये शनिवारी अजित पवार यांचा भव्य सत्कार झाला. त्यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये पार्थ पवार हे अजित पवार यांच्यासमवेत वाहनामध्ये नागरिकांचे अभिवादन स्वीकारत होते. या सत्कार समारंभास उपस्थित राहू न शकलेले जय पवार मंगळवारी बारामतीत आले होते. त्यांनी बारामतीमधील शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील आणि बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव या वेळी उपस्थित होते. जय पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशीू संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी ‘जय दादा यांनी बारामतीमध्ये सक्रिय होण्याची प्रेमळ मागणी केली.

हेही वाचा… …अन्यथा चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणार; आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा

यासंदर्भात ‘तुम्ही अजितदादांना विचारा. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच कामाला लागतो’, अशी ग्वाही जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता थेट अजित पवार यांच्याकडेच जय पवार यांना बारामतीच्या राजकारणात पार्थ पवार यांच्या सोबतच सक्रिय करावे, अशी मागणी करण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा… आमदार चेतन तुपे कोणत्या गटात…, अजित पवारांबरोबर व्यासपीठावर

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे दिसत आहे. अजित पवार यांच्या मिरवणुकीमध्ये पार्थ पवार हे त्यांच्या समवेत होते. मुंबईतील मेळाव्या दरम्यान अजित पवार यांच्या पाठीमागेच जय पवार हे अजित पवार यांच्या भाषणाच्या वेळेस पूर्ण वेळ थांबून होते. आज जय पवार यांनी देखील बारामतीला भेट दिल्यामुळे भविष्यात नवीन राजकीय समीकरणे उदयास येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will jai pawar will enter in active politics pune print news vvk 10 asj