पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे मागील काही काळापासून पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मनसेच्या विविध कार्यक्रमातून वसंत मोरे यांना डावलण्यात येत आहे. याबाबत वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर एकाच कारमधून प्रवास केला आहे. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

खरं तर, बुधवारी मनसे नेते वसंत मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच कारमधून प्रवास केला. दोन्ही नेत्यांनी पुण्यातील कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहाणी केली. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- “…म्हणून मला लपून राहावं लागलं”, पोलिसांच्या दबावाबद्दल रॅपर राज मुंगासेचा मोठा खुलासा!

कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहाणी केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. वसंत मोरे आणि आमचा मागील १३ वर्षांचा प्रवास आहे. आम्ही समन्वयाने काम करतो, असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलं.

हेही वाचा- “…तेव्हा सगळे आमदार हळुहळू शिंदे सरकारला सोडून जातील”, एकनाथ खडसेंचं महत्त्वाचं विधान

वसंत मोरेंसमवेत एकाच वाहनातून प्रवास केल्याबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गेल्या तेरा वर्षांचा हा प्रवास आहे. माझं म्हणणं असं आहे की, एकदा निवडणूक झाली की विकासाच्या कामात आमचे काहीच मतभेद नाहीत. आम्ही समन्वयाने काम करतो. गेल्या १३ वर्षामध्ये मला त्यांची (वसंत मोरे) मदतच झाली असेल, कदाचित माझाच त्यांना त्रास झाला असेल. याहून जास्त काही सांगू शकत नाही.”

Story img Loader