पिंपरी-चिंचवड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. उद्योगाबाबत कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये. अशा सक्त सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे जिल्हा हा टेक्नॉलॉजीच कॅपिटल आहे. या जिल्ह्यात अनेक गुंतवणूक येत आहेत. या गुंतवणुकीला जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण तयार करायला हवं. हे पोषक वातावरण पोलीस अधिकारी तयार करतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. उद्योजकांना कुठलाही त्रास होऊ नये. कुठलाही नेता असू द्या त्याला क्षमा (गय) केली जाणार नाही. असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. अनेक उद्योजकांच्या पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रारी आल्या होत्या, त्यांना त्रास होत असल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं. या विषयावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरूनच पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.