प्रथमेश गोडबोले

पुणे : यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पानशेत आणि वरसगाव ही प्रमुख धरणेच १०० टक्के भरली आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आज, दि. २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराच्या पाण्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांत मिळून एकूण २७.५५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९४.५० टक्के पाणीसाठा आहे. वरसगाव आणि पानशेत ही धरणे १०० टक्के भरली आहेत, तर खडकवासला धरणात ५६ टक्के आणि टेमघर धरणात ८० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १९ ऑक्टोबर रोजी चारही धरणांत ९९.७७ टक्के पाणीसाठा होता. यंदा चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सात वर्षांतील नीचांकी पाऊस झाला आहे.

आणखी वाचा-२४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क कमी आकारल्याने सहदुय्यम निबंधक निलंबित

महापालिकेला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्ल्यूआरआरए) नियमाचा दाखला देत जलसंपदा विभागाने १२.८९ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास दंड आकारण्याचा इशाराही दिला आहे. महापालिकेने २०.९० टीएमसी पाणी कोट्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर कालवा समितीची बैठक होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना शहर आणि ग्रामीण भागाला समान पाणीवाटप करताना कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाऊस संपायला अद्याप एक महिना बाकी असल्याचे कारण देत कोणतीही पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १५ ऑक्टोबरपर्यंत हीच स्थिती कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वास्तविक पावसाळ्यानंतरची कालवा समितीची बैठक नोव्हेंबर महिन्यात नियोजित होती. मात्र, परतीच्या पावसाचे चिन्ह नसल्याने आणि मोसमी पाऊस माघारी फिरल्याने ही बैठक २० ऑक्टोबरलाच घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.